देशविदेश

जगात तिसरं महायुद्ध लवकरच..रशियानं ओलांडली हद्द

ज्याची भिती होती तेच झालं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन युक्रेनला संपवण्यात गुंतलेत. मात्र त्यांच्या एका निर्णयामुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहे. पुतीन यांनी अण्वस्त्रांसंबंधीचा रशियानं अमेरिकेसोबत केलेला करार मोडलाय. देशाला संबोधित करत पुतीन यांनी करार मोडल्याची घोषणा केलीय.

 

रशियामुळे अणुयुद्ध?

  • रशियाकडे जगातील सर्वात मोठं अण्वस्त्रांचा साठा आहे
  • रशियाकडे 6 हजार अण्वस्त्रं आहेत
  • अमेरिकेकडे ५५५० पेक्षा कमी अणुबाँब आहेत

जर पुतिन यांनी युक्रेन युद्धात अण्वस्त्रांचा वापर केला तर जगात तिसरं महायुद्ध होण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही. अमेरिकेसोबतच्या न्यू स्टार्ट पॉलिसीमुळेच पुतिन यांचे हात बांधले गेलेले होते.

न्यू स्टार्ट पॉलिसी काय ?

  • न्यू स्टार्ट पॉलिसी म्हणजे सामाईक शस्त्र-मर्यादा करार
  • २०१० मध्ये रशिया आणि अमेरिकेनं करारावर स्वाक्षरी केली होती
  • या करारामुळे दोन्ही देशांच्या अण्वस्त्रंनिर्मितीवर मर्यादा आल्या होत्या
  • करारामुळे अणुबॉम्बवाहक मिसाईलच्या निर्मितीवरही मर्यादा होत्या

यापूर्वी पुतीन यांना चीड आणतील अशा गोष्टी सातत्यानं अमेरिकेकडून झाल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ऐन युद्धकाळात युक्रेनची राजधानी कीवला पोहचले. इतकच नाही तर त्यांनी युक्रेनला  ५०० मिलियन डॉलरची अतिरिक्त मदत करत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्कींचं धैर्य वाढवलं. युक्रेननंतर बायडेन पोलंडची राजधानी वॉर्सामध्ये पोहचले आणि तिथूनही पुतीन यांच्याविरोधात एल्गार पुकारला

बायडन यांनी येणा-या वर्षात NATO देशांच्या बैठकीचं यजमानपद स्वीकारण्याची घोषणा केलीय, त्यामुळे पुतीन यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय. रशिया-युक्रेन युद्धात पहिल्यांदाच अमेरिकेनं इतकी उघड भूमिका घेतल्यानं जगावर तिस-या महायुद्धाचे ढग दाटलेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button