सोन्याबाबत महत्वाची बातमी; केंद्र सरकारने जारी केला नवा नियम

यापुढे सोनं आणि सोन्याच्या दागिने ६ डिजीट अल्फान्युमेरिक HUID हॉलमार्कशिवाय सोन्याची विक्री करताच येणार नाही. म्हणजे असं सोनं ग्राह्य धरलं जाणार नाही, १ एप्रिल २०२३ पासून हा नियम लागू होणार आहे. असं सरकारने सांगितलं आहे.
हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी चिन्ह आहे आणि हॉलमार्किंग केंद्राच्या लोगोसह सोन्याची शुद्धता देखील लिहिलेली आहे. तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अँप बनवले आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अँपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रार करू शकता. या अँपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अँपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तात्काळ माहितीही मिळेल.



