
भारतीय जनता पक्षाचा आज ४४ वा स्थापना दिवस. १९८० मध्ये या दिवशी भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली होती. भारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होतं, जे १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झालं. १९८० मध्ये जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना केली होती. स्थापनेनंतर भाजपचे पहिले लक्ष गुजरात, राजस्थान आणि संयुक्त मध्य प्रदेश याच राज्यांवर होतं. केवळ तीन राज्यांपुरता मर्यादित असणारा पक्ष आज बघता बघता केवळ देशच नाहीतर संपूर्ण जगभरातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे.
सध्या १२ राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. लोकसभेत पक्षाच्या ३०३ जागा आहेत, तर राज्यसभेतही सुमारे १०० खासदार भाजपचे आहेत. कार्यकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातोय
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज स्थापना दिवसाच्या निमित्तानं दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण करणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यासंदर्भात मोदींनी एक ट्वीटही केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “६ एप्रिल हा दिवस भाजपसाठी महत्त्वाचा आहे, कारण हा पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्तानं सकाळी १० वाजता पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.”
भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ म्हणाले की, “आपल्या स्थापना दिनानिमित्त पक्षानं ६ एप्रिल २०२३ ते १४ एप्रिल या कालावधीत डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष सप्ताह पाळण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील.”
स्थापन दिवस साजरा करण्यासाठी भाजपकडून मोठी योजना आखण्यात आली आहे. तसेच, विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून संपूर्ण देशात भिंत लेखनाचं कामही केलं जाणार आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा स्वतः दिल्लीतील एका बूथवर जाऊन भित्तीलेखनाचे काम करणार आहेत. तसेच गेल्या वर्षाप्रमाणेच भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा सकाळी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण करतील. यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
१९८० मध्ये या दिवशी भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली होती. भारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होतं, जे १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झालं. १९८० मध्ये जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना केली होती. स्थापनेनंतर भाजपचे पहिले लक्ष गुजरात, राजस्थान आणि संयुक्त मध्य प्रदेश याच राज्यांवर होतं. अटल-अडवाणी जोडीनं भाजपला १६ वर्षांनी देशात सत्तेवर आणलं. १९९६ मध्ये पहिल्यांदा केंद्रात १३ दिवस अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार स्थापन झालं. मात्र, बहुमताअभावी त्यांना राजीनामा द्यावा लागला.
सध्या १२ राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. लोकसभेत पक्षाच्या ३०३ जागा आहेत, तर राज्यसभेतही सुमारे १०० खासदार भाजपचे आहेत. कार्यकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाची अनेक राज्यांमध्ये हायटेक कार्यालयंही आहेत. ४३ वर्ष जुन्या या पक्षाचे अनेक किस्से राजकीय विश्वात आहेत.



