जपानच्या संशोधकांनी काढला नवा निष्कर्ष; कोविडच्या दोन्ही लसीकरणानंतर काय होते?

जपानमधील ओकिनावा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (ओआयएसटी) च्या संशोधकांनी अहवाल दिला की लसीकरणापूर्वी आतड्यांतील जिवाणूंद्वारे “फ्यूकोज” पचन वाढते, हे लसीकरणाद्वारे सक्रिय झालेल्या टी-सेल्सच्या कमी संख्येशी संबंधित होते.
आपल्या आतड्यांतील कोट्यवधी जीवाणूंचा – ज्याला ‘गट मायक्रोबायोम’ म्हटले जाते, त्याचा आपल्या रोगप्रतिकारक आरोग्यावर किती महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो कम्युनिकेशन्स बायोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीवर लसीकरणाचा प्रभाव का बदलतो, यावरही यामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.
“एकसमान लस घेणार्या प्रत्येकाला एकसारख्या पातळीचे संरक्षण मिळत नाही, परंतु लोक इतका वेगळा प्रतिसाद का देतात हे आम्हाला अजूनही समजले नाही,” असे OIST इम्यून सिग्नल युनिटचे नेतृत्व करणाऱ्या प्रा. हिरोकी इशिकावा यांनी नमूद केले. अशा प्रकारे आम्ही अंदाज लावू शकतो की एखादी व्यक्ती एखाद्या लसीला कसा प्रतिसाद देईल, आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कदाचित नवीन धोरणे शोधावी लागतील.
या अभ्यासासाठी, इशिकावा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ओकिनावामध्ये राहणाऱ्या ९६ निरोगी सहभागींकडून स्टूलचे नमुने आणि अनेक रक्ताचे नमुने घेतले. लसीचा पहिल्या डोस घेण्याआधी आणि दुसऱ्या डोसच्या एका महिन्यानंतर हे नमुने घेण्यात आले.
हे संशोधन COVID-19 फायझर MRNA लसीला मिळालेल्या प्रतिसादावर केंद्रित असताना, संशोधकांचा असा विश्वास आहे की त्यांचे परिणाम इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार करण्यासाठी विकसित होत असलेल्या इतर MRNA लसींशी देखील संबंधित असू शकतात आणि कर्करोगापासून देखील वाचवू शकतात.



