वडगाव मावळ पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी; दुचाकी चोरणाऱ्या चार जणांना केले गजाआड

पुणे ग्रामीण गुन्हेवार्ता : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सीलबंद असलेले एका गोडाऊन मधील विदेशी कंपनीच्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीला वडगाव मावळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपींकडून ९ लाख ५० हजारांच्या एकूण ५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हरिदास सिताराम चवरे (वय ३० रा.टाकवे,मुळगाव रा.भटसागवी, हिंगोली) परशुराम दिगंबर सरडे वय ३१.रा अहिरवडे मुळगाव इंगळकी ता. अक्कलकोट जि. सोलापूर)तुफैल अलीम खान वय २१ रा.अहिरवडे मुळगाव उत्तरप्रदेश) इमरान रिझवान खान ( वय २५ अहिरवडे फाटा मुळगाव उत्तर प्रदेश)अशी अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील औद्योगिकी वसाहतीमधील
एका नामांकित उदयोगपतींचे मालकीचे गोडावुन असुन,सदरचे गोडायुन जुन २०२२ युनियन बैंक पुणे यांचेकडुन ताब्यात घेऊन सिलबंद करणेत आलेले होते. सदरचे गोडावुन बंद असल्याचा तसेच सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याचा गैरफायदा घेवुन आरोपीतांनी गोडावुन फोडून आतील विदेशी बनावटीच्या किंमती दुचाकींची चोरी केली.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक मितेश घटे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहाय्यक उपनिरीक्षक सुनिल जावळे, पो.हवा सचिन गायकवाड, श्रीशैल कंटोळी, संजय सुपे, सचिन काळे यांनी विशेष प्रयत्न केले या गुन्ह्यातील प्रकरणी पुढील तपास पो सचिन काळे करीत आहेत.
आरोपीनी गुन्हा सदरचे ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याचे तसेच त्याठिकाणी सुरक्षेचे कोणतेही आधुनिक साधने नसल्याचा गैरफायदा घेवुन गुन्हा केलेला असल्याचे तपासामध्ये उघड झालेले आहे. त्यामुळे औदयोगिक वसाहतींमध्ये उदयोजकांनी आपले गोडावुनचे सुरक्षेसाठी दिवसा व रात्रौ सुरक्षा रक्षक, सी.सी.टी.व्ही कॅमेरे, अलार्म सिस्टम या सारली अधुनिक सुरक्षाविषयक साधनांचा अवलंब करावा असे अवाहन वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी केले आहे.



