बनावट नोटा डिपॉझिट केल्याप्रकरणी ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

मुंबई गुन्हेवार्ता : एटीएममध्ये बनावट नोटा डिपॉझिट केल्याप्रकरणी ग्राहका विरोधात एमएचबी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. तक्रारदार हे एका खासगी बँकेत काम करतात.
दहिसर परिसरात बँकेचे एटीएम आहे. मे महिन्यात तक्रारदार हे एटीएम मेंटेनन्स तपासत होते. तेव्हा एका बॉक्स मध्ये १०० रुपयाच्या पाच बनावट नोटा त्याना दिसल्या. जप्त केलेल्या नोटा या खऱया नोटापेक्षा वेगळ्या होत्या.
नोटांच्या सिक्युरिटी थ्रेडमध्ये तफावत दिसली. वॉटर मार्कमध्ये महात्मा गांधी यांचे चित्र दिसत नव्हते. नोटा बनावट असल्याचे तक्रारदार याच्या लक्षात आले. तक्रारदार याने नोटा जमा करणाऱया ग्राहकाची माहिती काढली. बनावट नोटा एटीएममध्ये जमा केल्या प्रकरणी तक्रारदार याने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी ग्राहकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.



