गुन्हे

पुणे हादरलं; २ मुलांना विहिरीत फेकलं, पत्नीचा दाबला गळा; डॉक्टरने स्वतःसह संपवलं कुटुंब

पुणे गुन्हेवार्ता : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉक्टरने आपल्या पत्नीचा खून करुन दोन मुलींना विहिरीत टाकून स्वतःसह संपूर्ण कुटुंबच संपवलं आहे.

दौंड तालुक्यातील वरवंड येथे ही हृदय हेलवणारी घटना घडली आहे. अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाच हादरून गेला आहे. सोन्यासारखं कुटुंब एका क्षणात संपवलं.. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२) पल्लवी अतुल दिवेकर (वय ३९), अदिवत अतुल दिवेकर (वय ९) वेदांती अतुल दिवेकर (वय ६) अशी यांची नावे आहेत.

दौंड तालुक्यातील वरवंड येथे हे कुटुंबं वास्तव्यास होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की वरवंड येथील गंगासागर पार्कमध्ये घर क्रमांक २०१ मध्ये राहत्या घरी ही घटना घडली. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२) आणि पल्लवी अतुल दिवेकर (वय ३९) यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरी आढळले.

व्यवसायानी डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबला. नंतर दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतः घरी जाऊन आत्महत्या करुन कुटुंबच संपवलं. विहिर खोल असल्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यास अडचण येत आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

या घटनेने वरवंड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास उपनिरिक्षक संजय नागरगोजे, सागर चव्हाण, दत्तात्रय टकले, हनुमंत भगत करीत आहेत. डॉ. अतुल दिवेकर हे व्यवसायाने जनावरांचे डॉक्टर होते. तर पत्नी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button