गुन्हे

पुणे पोलीसांची गुन्हेगारांवर कारवाई करत केले एकाचवेळी ६५ गुंड हद्दपार

पुणे : हडपसर, तसेच वानवडी भागातील गुन्हेगारांना चाप बसविण्यासाठी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी या भागातील ६५ गुंडांना पुणे शहर, जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. एकाचवेळी ६५ गुंडांना हद्दपार करण्यात आल्याने गुंडांना जरब बसणार आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयु्क्त संदीप कर्णिक यांनी गुंडांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हडपसर, वानवडी भागातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली. सराइतांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये (हद्दपार) कारवाई करण्यात आली. गुंडांना पुणे शहर, जिल्हा, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायु्क्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त शाहूराजे साळवे, अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण काळे, आश्लेषा माने आदींनी ही कारवाई केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button