गुन्हे

धक्कादायक! रक्त पिणार का? म्हणत मित्राने दगडाने ठेचून केली हत्या

पुणे गुन्हेवार्ता :  पिंपरी- चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून मित्राने रक्त पिण्याची इच्छा व्यक्त करत मित्राच्या गळ्याचा कडाडून चावा घेतला. तर दुसऱ्या मित्राने माझं रक्त पिणार का? असे म्हणून त्याची दगडाने ठेचून हत्या केली आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी राहुल लोहार याला अटक केली आहे. इस्ताक खान असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून त्याने राहुल लोहार याच्याकडे रक्त पिण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या गळ्याचा चावा घेतला होता. याच रागातून राहुलने त्याची हत्या केली आहे. अशी माहिती भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरामध्ये सर्वसामान्यांसह पोलिसांना चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. मद्यपान करत असताना एका मित्राने दुसऱ्या मित्राकडे रक्त पिण्याचे इच्छा व्यक्त केली. त्याच्या गळ्याचा कडाडून चावा घेत रक्त पिण्याचा प्रयत्न केला. आरोपी राहुल लोहार आणि इस्ताक खान हे इतर दोन मित्रांसह मद्यपान करण्यासाठी बसले होते. तेव्हा, मयत इस्ताक खान याने राहुलकडे रक्त पिण्याची इच्छा व्यक्त केली, त्याच्या गळ्याला कडाडून चावा घेतला. दोघांमध्ये वाद झाले. राहुलने स्वतःची कशी- बशी सुटका करून तिथून पळ काढला. या घटनेच्या काही तासानंतरच राहुलने इस्ताक खानकडे आला तू माझे रक्त पिणार का? मी तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणून दगडाने ठेचून इस्ताक खान याची हत्या केली. या घटनेत प्रकरणे भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी राहुल लोहार याला अटक केली आहे. राहुल आणि इस्ताक खान हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button