मुंबई

पश्चिम रेल्वेने घेतला निर्णय;१२ डब्यांच्या ‘या’ ४९ लोकल ट्रेन १५ डब्यांसह धावणार

मुंबई :  मुंबई लोकलने नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सोयीचा आणि आरामशीर व्हावा याकरता रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. तसंच, प्रवासीवहन क्षमता वाढवण्याकडेही भर दिला जात आहे. पिक अवर्समध्ये चाकरमन्यांना लोकल ट्रेनच्या दारात लटकून प्रवास करावा लागतो. हा प्रकार टाळण्याकरता आणि एका ट्रेनमधून अधिकाधिक प्रवाशांना प्रवास करता यावा याकरता पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून हा बदल लागू होणार आहे.

१५ ऑगस्टपासून १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेने आज सोमवारी जाहीर केलेल्या माहतीनुसार, ४९ लोकल १५ डब्यांच्या करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button