गुन्हे

पोलीसांचा मोठा निर्णय..१८ वर्षाखालील मुलांनी गुन्हा केला तर वडिलांवर कारवाई होणार

पुणे : ध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश हा जास्त आहे. यामुळे आता पोलिसांनी एक निर्णय घेतला आहे. आता पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे.

यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या देखील तितकीच वाढत आहे. या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी १८ वर्षाखालील मुलगा गुन्हेगारीत आढळला तर त्याच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिली आहे.

दरम्यान, भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये विधी संघर्षित बालकाच्या वडिलांना घरात विनापरवाना हत्यारे बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात घेतले आहे. मुलांकडे गंभीर प्रकारची हत्यारे सापडली आहेत.

त्यामुळे पोलिसांकडून माध्यमातून गुन्हेगारीतील पाल्यांच्या वडिलांना सांगू शकतो की, आपण पाल्याला वेळीतच आवरा नाहीतर आत्ता भोसरी एमआयडीसी पोलीस पाल्याच्या वडिलांवरच कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

भोसरीत काही दिवसांपूर्वी दोन टोळीच्या वादातून एकावर वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याच घटनेतील आरोपींनी एका चहाच्या दुकानात येऊन धुडगूस घातला होता. तसेच या परिसरात दुचाकी गाड्या उभा केल्या होत्या.

या गाड्यांवर देखील आरोपींनी हल्ला चढवला. या सर्व प्रकरणानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंद झाल्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस आरोपीच्या शोधात होते. त्यावेळेस सहापैकी चार विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button