पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ५ असे निर्णय जे वर्षानुवर्षे विसरु शकणार नाहीत लोक!

यामध्ये एटीएम कार्ड व्यतिरिक्त त्यांना ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते. ही योजना सुरू झाल्यानंतर करोडो लोकांनी आपली खाती उघडली.नोटाबंदी ८ सप्टेंबर २०१६ ची ती संध्याकाळ क्वचितच कोणी विसरेल. जेव्हा पंतप्रधानांनी अचानक ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांना बँकेत पैसे जमा करण्याची परवानगी देण्यात आली.
बनावट नोटा आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासोबतच, पीएम मोदींचा हा निर्णय सीमेपलीकडील दहशतवादाचे कंबरडे मोडणारा होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) रिपोर्टनुसार, ५०० आणि १००० रुपयांच्या एकूण ९९.३० टक्के जुन्या नोटा परत आल्या आहेत. मात्र, काही काळानंतर ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या.UPI डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) ३१ डिसेंबर २०१६ रोजी लॉन्च करण्यात आला. त्यामुळे लोकांच्या जीवनात बरीच सोय झाली.
UPI हे आता डिजिटल ट्रांझेक्शनचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे. आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, ऑगस्टमध्ये UPI द्वारे झालेल्या व्यवहारांनी १०.५ लाख कोटी रुपयांची पातळी ओलांडली होती.जीएसटीसंपूर्ण देशात एकच कर प्रणाली लागू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जीएसटी लागू केला. जीएसटी २९ मार्च २०१७ रोजी लोकसभेने मंजूर केला होता. मात्र ही प्रणाली १ जुलै २०१७ पासून लागू झाली.
‘एक देश एक कायदा’च्या दिशेने मोदी सरकारचा हा मोठा निर्णय होता. त्यामुळे देशभरात एकाचवेळी व्हॅट, एक्साइज ड्यूटी आणि सर्व्हिस टॅक्स यांसारख्या अप्रत्यक्ष करांची व्यवस्था बदलण्यात आली.जीवन विमा आणि अपघात विमापंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) योजनेअंतर्गत, १८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांना २ लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा दिला जातो आणि त्यासाठी वर्षाला ४३६ रुपये भरावे लागतात. याशिवाय, १८ ते ७० वर्षे वयोगटातील नागरिकांना २ लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा देण्यासाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) सुरू करण्यात आली. यासाठी वर्षाला फक्त २० रुपये मोजावे लागतात.



