गुन्हे

ॲपे चोरणा-या टोळीस पकडून ८ लाख ४४ हजाराचा ऐवज जप्त; १० ॲपे हस्तगत

नवी मुंबई : ॲपे ही तीन चाकी माल वाहतूक व प्रवासी करणाऱ्या वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे अटक आरोपी हे तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक केल्याने ही साखळी मोठी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अन्वर रसुलखान पठाण- वय ३९ वर्षे, मन्नन अब्दुल शेख- वय ३६ वर्षे, फिरोज मुक्करम शेख (उर्फ मुल्ला)- वय ४९ वर्षे अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील अन्वर हा मूळ बीडचा असून सध्या तळोजा येथे राहतो. तर मन्नत बीड आणि फिरोज हा जालन्यातील परतूर येथे राहणारा आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई आणि परिसरातून ॲपे ही तीन चाकी गाडी चोरीचे प्रमाण वाढले होते.

एखाद्या प्रकारची विशिष्ट गाडी हेरून हा प्रकार सुरू असल्याचा संशय पोलिसांना आला. याबाबत पोलीस आयुक्त,  मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे),  दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे),  अमित काळे यांनी ॲपे टेम्पो चोरीतील गुन्हयांना आळा घालणेकामी व घडलेले गुन्हे उघडकीस आणन्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यामुळे विविध पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा इकत्रीत तपास गुन्हे शाखेने सुरू केला. सदर तपास सहाय्यक पोलीस आयुक्त  गजानन राठोड यांच्या सुचनांप्रमाणे गुन्हे शाखेचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उमेश गवळी यांनी विशेष पथक स्थापन केले.

या पोलीस पथकाने नवी मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्हयांची माहिती प्राप्त केली. त्याअनुषंगाने सर्व दाखल गुन्हयांतील चोरीस गेलेल्या ॲपे टेम्पो चोरीचे घटनास्थळांना भेट देवून तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांचे मदतीने तपास सुरू केला. या एकत्रित तपासामुळे  तळोजा येथे राहणाऱ्या अन्वर बाबत माहिती पोलिसांना मिळाली. अन्वर याला पोलिसांनी कळंबोली परिसरात झालेल्या ॲपे चोरी प्रकरणात ताब्यात घेत चौकशी केली . चौकशी दरम्यान त्याने अन्य दोघांची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ बीड आणि परतूर पोलिसांची मदत घेत मन्नत आणि फिरोज यांना अटक केली. या तिघांच्या चौकशीतून १२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यांना अटक केल्यावर त्यांनी दिलेल्या माहिती वरून विविध ठिकाणाहून ८ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यात १० ॲपे टेम्पो, एक मोटर सायकल व एक टेम्पोचे इंजिनचा समावेश आहे.

सदर पोलीस पथकाने नवी मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्हयांची माहिती प्राप्त केली. त्याअनुषंगाने सर्व दाखल गुन्हयांतील चोरीस गेलेल्या ॲपे टेम्पो चोरीचे घटनास्थळांना भेट देवून तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांचे मदतीने तपास सुरू केला. गोपनिय बातमीदारांकडुन अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपींबाबत अधिक माहिती घेवून गुन्हे शाखा कक्ष २, पनवेल चे पोलीस पथकाने कळंबोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १५५/२०२२ भा.द.वि. कलम ३७९, ४११, ३४ या गुन्हयामध्ये आरोपी क्रमांक १ यास अटक केली. आरोपीने चोरी केलेले इतर ॲपे टेम्पो गुन्हयातील पाहिजे आरोपींना विकल्याची माहिती दिल्यानंतर आरोपी क्रमांक २ यास परतुर, जिल्हा जालना येथुन व आरोपी क्रमांक ३ यास बीड येथुन ताब्यात घेवून त्यांचेकडुन चोरीचे विकत घेतलेले ॲपे टेम्पो हस्तगत करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button