गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करून लुट करणाऱ्या टोळीला अटक; ६२ डेबिट कार्ड जप्त

पुणे : टीएममशीन मधून पैसे काढून देण्याच्या मदतीने कार्डची अदलाबदली करून त्याद्वारे हजारो रुपयांच्या वस्तूंची खरेदी आणि रोख रक्कमेचा अपहार करणाऱ्या दोन तरुणांना विश्रांतवाडी पोलीसांनी अटक केली. डोक्यावर कर्ज झाल्याने तरुणाने मित्राच्या मदतीने एटीम चोरून फसुवणूकीला सुरुवात केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून ४५ हजारांचे सोने,पन्नास हजार रुपये रोख आणि ६२ डेबिट कार्ड जप्त केले आहे. मयंककुमार संतराम सोनकर (वय.२७, रा.धानोरी) आणि कपिल राजाराम वर्मा (वय.३०, रा. परांडे नगर,धानोरी, मूळ गाव उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रमेश विठाजी ढवळे (वय.६९, रा. अट्रीया सोसायटी,धानोरी) यांनी तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विश्रांतवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या एटीएममध्ये फिर्यादी ढवळे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी मशीनमधून पैसे काढून देण्याच्या मदतीने त्यांच्या पत्नीच्या नावे असलेले एटीम कार्ड हातचलाखीने चोरी केले. त्यानतंर आरोपींनी चोरलेल्या एटीम कार्डमधून ९० हजारांची वस्तू खरेदी आणि रोख रक्कम काढली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास केला जात असताना विश्रांतवाडी येथील सारस्वत बँकेच्या समोर आरोपी येणार असल्याची माहिती कर्मचारी शेखर खराडे आणि प्रफुल्ल मोरे यांनी मिळाली होती.वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेशानंतर पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर अटक केली. पोलीसांनी आरोपींकडून ४५ हजारांचे सोने,५० हजार रुपये रोख, बँकेतून आणि नागरिकांचे चोरलेले ६२ डेबिट कार्ड आणि दुचाकी वाहन जप्त केले आहे. आरोपी सोनकर याच्यावर कर्ज झाल्याने ते फेडण्यासाठी तो अपहार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आरोपींवर पूर्वीचे फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश चव्हाण,दीपक चव्हाण, प्रफुल्ल मोरे शेखर खराडे,संदीप देवकाते, पिसाळ आणि संजय बादेरे यांनी कामगिरी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button