गुन्हे

मुंबईमध्ये जेवणाच्या पार्सलवरून झालेल्या वादातून एकाची हत्या

मुंबई : जेवणाच्या पार्सलवरून झालेल्या वादातून चेंबूर येथे एका २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल रणदिवे (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो चेंबूरमधील सम्राट अशोक नगर येथील रहिवासी होता. त्याचा भाऊ सुनील रणदिवे (२३) याच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सुनील रणदिवे याचा सजावटीचा व्यवसाय आहे.

तक्रारीनुसार अनिल चेंबूर आर. सी. मार्ग येथील सन्निधी बार येथे जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे आरोपी रितीक बजाज (२३) व हर्षद वलोड्रा (२७) हेही उपस्थित होते. जेवणाचे पार्सल पहिला कोण घेणार या वादातून दोन्ही आरोपींनी अनिलला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी कड्याने अनिलला मारहाण केली. अनिलच्या तोंडावर, डोक्यावर व छातींवर गंभीर दुखापत झाली. अनिल खाली कोसळला. अनिलला तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button