गुन्हे

पिंपरीत दांडियातील वादातून टोळक्याची दोघांना कोयत्याने मारहाण

पिंपरी : दांडिया खेळताना झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलाला आणि भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या भावाला कोयत्याने मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास खराळवाडी येथे घडली.

याबाबत मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष थोरात (वय २१), आकाश थोरात (वय २२), आदित्य मंगळवेडेकर (वय २१), नितीन शिंगाडे (वय ४०, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांचा साथीदार क्रिश शिंगाडे (वय २१) हा पसार आहे.

दांडिया खेळत असताना फिर्यादीला आरोपी संतोष याची दांडिया लागली. त्यामुळे नीट दांडिया खेळ, असे फिर्यादी बोलला. त्यावरुन त्यांच्यात भांडण झाले. आरोपी आपल्या साथीदारांना घेऊन परत आला. आरोपींनी फिर्यादीला खाली पाडले. लाथा-बुक्यांनी मारहाण केली. आरोपी नितीनने डोक्यात स्टीलचा पाइप मारला. फिर्यादीचा मावस भाऊ रोहित जाधव हा भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आल्यानंतर आरोपींनी ‘तू आमच्या मध्ये काय येतोस, तुला ठार मारतो’ असे म्हणत त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. स्टीलच्या पाइपने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button