गुन्हे

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरीयन नागरिकास अटक; ठाणे पोलिसांची कारवाई

ठाणे : नाताळ सुट्टी आणि नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित पार्टीकरिता अंमलीपदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन नागरिकास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट ५ ने अटक केले आहे. त्याच्याकडून ३१ ग्रॅम वजनाचे कोकेन पावडर जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १२ लाख ४० हजार इतकी आहे. ओकोरी इमॅन्युअल ब्राईट (३३) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तो नालासोपारा या भागात राहणारा आहे. तो ठाणे शहरातील आनंदनगर चेकनाका सेवा रस्त्याजवळ कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करीता येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने सापळा रचून त्याला मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला २६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्याकडून ३१ ग्रॅम वजनाचे १२ लाख ४० हजार किंमतीचे कोकेन, मोबाईल, नायजेरीया देशाचा पासपोर्ट व विजा जप्त करण्यात आला आहे. हा व्यक्ती मुळचा नायजेरीया देशाचा रहिवाशी आहे. त्याने कोकेनचा साठा कुठून आणला होता आणि तो कुठे विकणार होता याचा तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button