गुन्हे

पुण्यात दहशत माजविणाऱ्या ८२ गुंडांविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई

पुणे : एनडीए रस्ता परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडाची रवानगी वर्षभरासाठी नागपूर कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ८२ गुंडांविरुद्ध एमपीडीए कारवाई केली असून, गुंडांची रवानगी वेगवेगळ्या कारागृहात करण्यात आली आहे.

प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम (वय २३, रा. शांतीबन सोसायटी, शिवणे, एनडीए रस्ता) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. कदम आणि सथीदारांनी गंभीर गुन्हे केले अहेत. कदमविरुद्ध गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि गुन्हे प्रतिबंधक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी तयार केला होता.

पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला. पोलीस आयुक्तांनी प्रस्ताव मंजूर करून, कदम याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. कदमला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button