गुन्हे

वर्तकनगर भागात एका मुलावर चाकूने हल्ला

ठाणे : येथील वर्तकनगर भागात दहावीत शिकणाऱ्या एका मुलावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्तकनगर भागातील मराठी माध्यमाच्या शाळेत तो शिकत असून परिक्षेवरुन येताना त्याच्यावर हल्ला झाला. या भागातील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मुलीच्या प्रकरणातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी वर्तक नगर पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

ठाण्यातील ज्ञानेश्वर नगर भागात हा मुलगा राहत असून वर्तकनगर भागातील एका मराठी माध्यमाच्या शाळेत दहावीचे शिक्षण घेत आहे. सध्या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरु आहेत. हा मुलगा गुरुवारी सकाळी परिक्षेवरुन घरी परताना त्याच्यावर तीन मुलांनी चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मुलावर जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. तसेच हा हल्ला मुलीच्या प्रकरणातून झाला असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button