भारत

अनुराग ठाकूर यांची घोषणा; ‘खेलो इंडिया’तील पदक विजेत्यांना मिळणार सरकारी नोकरी;

वी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी, ६ मार्चला सांगितले की, खेलो इंडिया पदक विजेते खेळाडू आता सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र होतील, ट्विटरवरील एका पोस्टमध्ये, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, खेलो इंडियातील पदक विजेते खेळाडू आता सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र असतील.” “मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की @DoPTGoI ने @IndiaSports शी सल्लामसलत करून, सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्या खेळाडूंच्या पात्रता निकषांमध्ये प्रगतीशील सुधारणा केल्या आहेत, असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.

२०१८ मध्ये पहिल्यांदा खेलो इंडिया गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासून या खेळांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. परंतु आता क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी खेळांच्या निकषांमध्ये मोठा बदल केला आहे. खेलो इंडियामध्ये पदक जिंकणारे खेळाडू आता सरकारी नोकरीसाठी पात्र ठरणार आहेत. यापूर्वी खेलो इंडिया गेम्सचे खेळाडू सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र नव्हते, पण सरकारने खेळाडूंना मोठी भेट दिली आहे.

अनुराग ठाकूर यांनी ट्वीटरवर लिहिले की, मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकारी नोकऱ्यांचे निकष बदलण्यात आले आहेत. या पावलामुळे आता खेलो इंडियाचे पदक विजेते खेळाडू सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र असतील. या सुधारित नियमांमुळे भारत क्रीडा महासत्ता बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button