गुन्हे

पेल्हार पोलिसांच्या कारवाईत ६० लाखांची सांबर शिंगे जप्त

वसई : पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांबर या वन्य प्राण्यांच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ६० लाख रुपये किंमतीचे दोन सांबर शिंगे जप्त करण्यात आले आहेत.

पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालासोपारा पूर्वेच्या अॅपल इंडस्ट्री येथे १२ मार्च रोजी दोन व्यक्ती वन्य प्राण्याच्या शिंगाची विक्री करण्याकरीता येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना मिळाली होती. त्याची माहिती तातडीने वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना देण्यात आली.  त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार तातडीने सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मोहम्मद इम्रान फरियादअली शाह (४२)  अशोक विरजीभाई पटेल (५८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून दोन शिंगे, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, मोबाईल असा ६० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली पूर्व मुंबई यांच्याकडून लेखी अभिप्राय घेण्यात आला असून त्यांनी सदरचे शिंग हे सांबर वन्य प्राण्याची असल्याचे उघड झाले. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४४, ४८ सह भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) (ड), २६ (१) (आय) ६५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे  सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button