गुन्हे

क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या

ठाणे : भिवंडी येथील केजीएन चौक भागात मंगळवारी क्षुल्लक कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला होता. या वादात जुबेर शेख (४८) यांची हत्या झाली आहे. याप्रकरणी १४ जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी येथे सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. या कारणावरून मंगळवारी केजीएन चौक येथील एका चाळीमध्ये दोन्ही गटामध्ये वाद झाला. या घटनेत जुबेर शेख यांच्यावर प्राणघातक शस्त्रास्त्राने हल्ला करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेचे चित्रीकरण पोलिसांना प्राप्त झाले आहे. याप्रकरणी १४ जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button