देशविदेशभारत

क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठा फेरबदल; डिजिटल चलन बिटकॉइनने गाठला धडकी भरवणारा आकडा

वृत्तसंस्था : जगातील सर्वात जुनी, सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनची किंमत प्रथमच $१००,००० च्या वर उसळली आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयानंतर या आभासी चलनाची किंमत सातत्याने भरारी घेत असून ट्रम्प सरकार क्रिप्टो-अनुकूल धोरणे बनवेल अशी गुंतवणूकदारांना आशा असून यामुळेच क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीला पंख फुटले आहेत. यावर्षी आतापर्यंत बिटकॉइनच्या किंमतीत १००% वाढ झाली असून ट्रम्प यांच्या निवडणूक विजयानंतर चार आठवड्यांत ४५ टक्क्यांनी किंमत वधारली. यासह, बिटकॉइनचे मार्केट कॅप प्रथमच दोन ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेली आहे.

बिटकॉइन सुरुवातीच्या व्यापारात २ टक्क्यांहून अधिक वाढीसह $१००,२७७ च्या सर्वकालीन उच्चांकावर उसळला. यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनचे अध्यक्ष गॅरी जेन्सलर गेल्यानंतर क्रिप्टो गुंतवणूकदारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असून सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनचे नेतृत्व करण्यासाठी ट्रम्प यांनी पॉल ऍटकिन्स यांचे नामांकन जाहीर केले. टोकन अलायन्सचे सह-अध्यक्ष म्हणून ॲटकिन्स यांना क्रिप्टोकरन्सी धोरणाचा अनुभव असून ॲटकिन्स सध्या Patomac पार्टनर्सचे सीईओ आहेत. ट्रम्प यांनी नियमांबद्दलच्या त्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनाचे कौतुक केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणूक प्रचारादरम्यान डिजिटल मालमत्तेचे समर्थन केले आणि अमेरिकेला दुनियेतील क्रिप्टो राजधानी म्हणून स्थापित करण्याबद्दल व राष्ट्रीय बिटकॉइन रिझर्व्ह तयार करण्याबद्दल विधान केले होते. हाँगकाँगमधील स्वतंत्र क्रिप्टोकरन्सी विश्लेषक जस्टिन डी’अनेथन म्हणाले की, एक लाख डॉलर ओलांडणे बिटकॉइन केवळ एक मैलाचा दगड नाही. वित्त, तंत्रज्ञान आणि भू-राजकारणातील बदलाचा पुरावा असून काही काळापूर्वी जे काल्पनिक म्हणून फेटाळले गेले ते आजचे वास्तव आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button