गुन्हे

पालघरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने बलात्कार

पालघर : महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घडना समोर आली आहे. पालघरच्या वाडा तालुक्यात ही घडली आहे. पोलिसानी विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी आणि तिचे वडील घरी निघाले होते. वाटेतच त्यांच्या ओळखीचा एक व्यक्ती त्यांना भेटला. घरी सोडण्याच्या बहाण्याने दोघांना आरोपीने लिफ्ट दिली. मात्र गावाजवळ आल्यानंतर शेठकडून पैसे आणायचे आहेत, असं सांगून आरोपींना पीडितेच्या वडिलांना शॉर्टकटने घरी जाण्यास सांगितलं. तर मुलीला घरी सोडतो असं सांगितलं.

ओरापी ओळखीचा असल्याने वडिलांनी देखील विश्वास ठेवला आणि ते बाईकवरुन उतरले. त्यानंतर आरोपींनी मुलीला पुढे जंगलात नेले आणि तिथे तिला मारहाण करत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तसेच घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर जीवे माहण्याची धमकी देखील आरोपीने पीडित तरुणीला दिली. पीडित तरुणीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर पीडितेने पालकांसह पोलीस्ट स्टेशनमध्ये जात याबाबत तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक, अजित साबळे, पोलीस उप निरीक्षक, मयुर शेवाळे यांच्या नेतृत्वात तपास पथक नेमून तात्काळ कारवाई केली आणि अवघ्या दोन तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button