EPFO संदर्भात घेतला मोठा निर्णय! हायर पेन्शन घेणाऱ्यांसाठी सरकारने वाढवलीअंतिम मुदत

कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत, १५,००० रुपयांपर्यंतच्या पगारानुसार कॉन्ट्रिब्यूशन निश्चित केले जाते, म्हणजेच मूळ वेतन ५०,००० रुपये झाले तरीही, EPS मध्ये कॉन्ट्रिब्यूशन केवळ १५,००० रुपयांवरून निश्चित केले जाईल. यामुळे ईपीएसमध्ये खूप कमी पैसे जमा करता येतात, म्हणजेच पेन्शन तयार होते. आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, १ सप्टेंबर २०१४ रोजी EPFO सदस्यही या उच्च पेन्शन पर्यायाचा लाभ घेऊ शकतात. यासाठी न्यायालयाने ईपीएफओला चार महिन्यांचा म्हणजेच 3 मार्च 2023 पर्यंत वेळ देण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय लक्षात घेऊन EPFO ने २० फेब्रुवारी २०२३ रोजी परिपत्रक जारी केले. यामध्ये जास्तीत जास्त १५ हजार रुपयांच्या सॅलरीच्या ८.३३ टक्क्यांच्या डिडक्शनऐवजी ऐम्प्लॉयीजच्या बेसिक सॅलरीच्या आधारावर करण्यास सांगितले.
पात्र EPS सदस्याला जवळच्या स्थानिक EPFO कार्यालयात जाऊन अर्ज भरावा लागेल. याशिवाय आवश्यक कागदपत्रे सबमिट करावी लागतील. व्हॅलिडेशनसाठी अर्जामध्ये पूर्वीच्या सरकारी अधिसूचनांमध्ये अनिवार्य केल्याप्रमाणे डिस्क्लेमर देखील असले पाहिजे. प्रत्येक अर्जाचा डेटा डिजिटल असेल आणि अर्जदारांना एक पावती क्रमांक दिला जाईल. हायर पेन्शनच्या अर्जांची तपासणी करून जो निर्णय घेतला जाईल, तो अर्जदारांना ई-मेल किंवा पोस्ट आणि एसएमएसद्वारे कळवला जाईल. ईपीएफओच्या आदेशानुसार, जॉइंट ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आणि ड्यू कॉन्ट्रिब्यूशनच्या पेमेंटविषयी एखादी तक्रार असेल तर EPFIGMS पोर्टलवर तक्रार करता येऊ शकते.



