भारत

देशात पुन्हा कोरोनाचा कहर; २४ तासांत तब्बल ‘इतके’ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूनं थैमान घालायला सुरुवात केलीये. गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये १०० टक्के वाढ झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, कोरोनाच्या नवीन रुग्णांचा आकडा ६ हजारांच्या पुढं गेला आहे. गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचे ६,०५० रुग्ण आढळले आहेत. काल म्हणजेच, गुरुवारी नवीन रुग्णांची संख्या ५,३३५ होती.

देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २८,३०३ झाली आहे. गुरुवारी देशात एकूण २५,५८७ सक्रिय रुग्ण होते. सक्रिय प्रकरणं सध्या एकूण प्रकरणांपैकी ०.०६ टक्के आहेत.

विशेष म्हणजे, देशात गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये जवळपास १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ४ एप्रिल रोजी नवीन रुग्णांची संख्या ३,०३८ होती. ५ एप्रिलला नवीन रुग्णांची संख्या ४,४३५ वर पोहोचली. दुसऱ्या दिवशी ६ एप्रिल रोजी कोरोनाचे ५,३३५ रुग्ण आले होते, तर आज ६,०५० कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button