वाकड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी केल्या ९० दुचाकी जप्त; २१ आरोपी जेरबंद

पुणे गुन्हेवार्ता : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड पोलिसांनी गेल्या वर्षभरात दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळत तब्बल ४५ लाखांच्या ९० दुचाकी जप्त केल्यात. ही आकडेवारी गेल्या वर्षभराची आहे. तसेच, २१ आरोपींना बेड्या ठोकलेल्या असून ९० गुन्हे उघडकीस आणले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिली आहे. पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे. देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक शहरात वास्तव्यास आहेत.
बहुतांश नागरिक व्यवसायाच्या निमित्ताने शहरात आलेले असल्याचे बघायला मिळते. नागरिकांच्या दुचाकी चोरण्याचं प्रमाण जास्त आहे. शहरातील विविध भागात दुचाकी चोरण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. गेल्या वर्षभरात वाकड पोलिसांनी अशाच आरोपींचा शोध घेऊन आत्तापर्यंत ९० गुन्हे उघड करत २१ आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे. त्याचबरोबर ४५ लाखांच्या ९० दुचाकी जप्त केलेल्या आहेत. ही आकडेवारी गेल्या वर्षभराची आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली आहे. नुकतंच वाकड पोलिसांनी चार जणांच्या टोळीला जेरबंद करत दहा गुन्हे उघड केले असून दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.



