गुन्हे

हॉटेल व्यावसायिकाला मैत्रीच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : हॉटेल व्यावसायिकाला मैत्रीच्या जाळ्यात ओढून एक लाख ८० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या महिलेविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बाबत एका हॉटेल व्यावसायिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी महिला हॉटेल व्यावसायिकाच्या मित्राची पत्नी आहे. आर्थिक व्यवहारांमुळे दोघांमध्ये मैत्रीसंबंध निर्माण झाले. त्यानंतर महिलेने हॉटेल व्यावसायिकाच्या प्रेमपाशात ओढण्याचा प्रयत्न केला. हॉटेल व्यावसायिकाने तिला प्रतिसाद दिला नाही. महिलेने त्याला शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकावले. मात्र, त्याने नकार दिला. त्यानंतर हॉटेल व्यावसायिकाकडे तिने दोन लाख रुपयांची मागणी केली.

बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करून नातेवाईकांत बदनामी करण्याची धमकी तिने हॉटेल व्यावसायिकाला दिली. घाबरलेल्या हॉटेल व्यावसायिकाने तिला एक लाख २० हजार रुपये दिले. त्यानंतर हे प्रकरण मिटवावे लागेल, असे सांगून तिने त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. हॉटेल व्यावसायिकाने तिला ६० हजार रुपये दिले. हॉटेल व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना तिने धमकावून शिवीगाळ केल्याचे हॉटेल व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर आरोपी महिला हॉटेल व्यावसायिकाला धमकावत होती. तिच्या धमकीमुळे घाबरलेल्या हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button