गुन्हे

ठाण्यात २४ घरफोडी, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

पिंपरी : मुंबई-ठाणे परिसरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला व त्याच्या साथीदाराला वाकड पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. आरोपीवर मुंबई-ठाणे शहरात २४ ठिकाणी घरफोडी केली आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये  केलेल्या पहिल्याच घरफोडीत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील १ लाख २२हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

अब्दुल उर्फ चिरा इद्रिस शेख (वय-४७ रा. आदर्श निवास, अलकापुरी, नालासोपारा (पु) जि. पालघर), धर्मेश रामआचरे दिवाकर (वय-२८ धंदा रिक्षा चालक रा. नालेश्वर निवास, अलकापुरी, नालासोपारा (पु) जि. पालघर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अब्दुल शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबई, पालघर, ठाणे येथील विविध पोलीस ठाण्यात २४ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसा व रात्रीच्या वेळी घरफोडीचे गुन्हे वाढत आहेत. याच दरम्यान वाकडमधील एका मोठ्या सोसायटीमध्ये आणि उंच टॉवर वरच्या पाचव्या मजल्यावर गॅलरीच्या सहाय्याने चढून घरफोडी केल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आला होता. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button