गुन्हे

४७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार आरोपीस सात वर्षानंतर अटक

 पुणे : पुणे जिल्हांसह इतर जिल्ह्यांमध्ये केलेल्या चीट फंड घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपीला पुणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली आहे. भारतातील सुमारे ६४ लाख लहान गुंतवणूकदारांची फसवणूक करुन आरोपी फरार झाला होता. समृद्ध जीवन ग्रुप नावाने कंपनीकडून, खोटी आश्वासने देऊन लाखो लोकांना गुंतवणूक करण्यास लावली होती. ४७०० कोटी रुपयांचा हा घोटाळा होता. पुण्यासह राज्यातील उस्मानाबाद, जळगाव या जिल्ह्यांमध्ये आरोपी विरोधात गुन्हे दाखल आहे. २०१५ आणि २०१६ मध्ये पैशांची अफरातफर आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी समृद्ध जीवन या कंपनीच्या संचालकांवर करण्यात गुन्हे दाखल आले होते. रामलिंग हिंगे (वय ५६, रा. गोकुळनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महेश मोतेवार व रामलिंग हिंगे यांनी ही फसवणूक केली होती. या दोघे मुख्य आरोपी आहे. महेश मोतेवार अजूनही फरार आहे.

समृद्धी जीवन ग्रुप कंपनीविरोधात २०१५ आणि २०१६ पुण्यासह राज्यातील उस्मानाबाद ,जळगाव या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात ग्रुपचे चेअमरन महेश मोतेवर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य आहेत. सर्वांविरोधात एकूण २६ गुन्हे दाखल होते. सीबीआय, ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच ओडिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, झारखंड आणि आंध्र प्रदेशातील पोलिसांना हे आरोपी हवे होते. देशातील ६४ लाख गुंतवणूकदारांची त्यांनी फसवणूक केली होती. त्यात महाराष्ट्रातील १८ लाख गुंतवणूक आहेत. या प्रकरणात २५ आरोपी आहे. त्यातील १६ जणांच आतापर्यंत अटक झाली आहे.

कंपनीचे चेअरमन महेश मोतेवार आणि संचालक रामलिंग हिंगे गेल्या सात वर्षांपासून फरार आहेत. त्यातील रामलिंग हिंगे याला आता अटक झाली आहे. हिंगे सातारा रोडवरील सिटी प्राईडजवळ येणार असल्याची माहिती सीआयडीला मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. महेश मोतेवार याने समृद्धी जीवन फुड्स इंडिया लिमिटेड आणि समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज को. ऑप सोसायटी स्थापन केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button