
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर आता येत्या ३१ तारखेला सुनावणी होणार आहे.
विधीमंडळ पक्षातील फुटीला पक्षातील फुट समजणे चुकीचे असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांना निवडणूक चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय कायदेशीर चुकांनी भरलेला असून आयोगानं चिन्ह आदेशाच्या परिच्छेद १५ नुसार दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे, असा दावा ठाकरे गटाने याचिकेतून केला आहे



