गुन्हे

दारू पिताना चकणा मागितल्याने एकाचा खून; पुणे पोलीसांनी केला खुनाचा उलगडा

 पुणे गुन्हेवार्ता : बिबवेवाडी भागातील सरगम चाळीच्या आवारात दारू पिताना चकणा मागितल्याने दोघांनी एकाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोन जणांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली असून, खून झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. केतन श्याम टेमकर (वय १९) आणि ओंकार लक्ष्मण सणस (वय २२, दोघे रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बिबवेवाडी भागातील सरगम चाळ परिसरातील मोकळ्या जागेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाची पाहणी केल्यावर डोक्यात दगड घालून खून केल्याचे उघडकीस आले होते. मृताची ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे खून कोणी आणि का केला, हे कळत नव्हते. मात्र, आता बिबवेवाडी पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग बिबवेवाडी भागात गस्त घालत होते. त्या वेळी टेमकर आणि सणस यांनी एकाचा खून केल्याची माहिती त्यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने टेमकर आणि सणसला पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, दोघांनी सरगम चाळीच्या परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक सविता ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय पतंगे, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, संजय आदलिंग, शैलेश आलाटे, संतोष जाधव, सतीश मोरे, शिवाजी येवले, तानाजी सागर यांनी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button